ढाणकी प्रतिनिधी, दिगांबर शिरडकर
महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, चितंगराव कदम शिवसेनेचे उमरखेड तालुका प्रमुख प्रवीण पाटील मीराशे व ढाणकी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय सल्लेवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत 25/10/2025 रोजी ढाणकी शहर प्रमुख संजय सल्लेवाड यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. एरवी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस व भाजपात लढत असायची परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिरंगी लढत पाहावयास मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस सह भाजपाने खोटी आश्वासने देऊन अनेक निवडणुका जिंकल्या त्यामुळे मतदारांचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडालेला दिसून येत आहे. ढाणकी शहर हे अनेक समस्याचे माहेर घर बनले असून या पाच वर्षात नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागले. शहरात एक एक महिना नळाला पाणी नाही, कचरा गाडी फिरत होती ती कचरा गाडी अधांतरीच फिरणे बंद झाली, नालेसफाई चे काम नाही, कधीकाळी नाल्या उपसल्या परंतु उपसलेल्या नालीतील ढिगारे जसेच्या तसेच परत नालीत वाहून गेले. पावसाळ्याच्या दिवसात अनेक घरात पाणी शिरले, शहरात रस्त्याचे काम अपुरे राहिले काही कामे झाली ते पण निकृष्ट दर्जाची करण्यात आली. मग एक ना अनेक समस्या असताना प्रबळ दावे करणारे मोठ मोठे पक्ष यांच्या आश्वासनाचे झाले तरी काय?असा प्रश्न यांना जनता उपस्थित करीत आहे. शहरात एवढ्या समस्या असताना कोणताच मोठा पक्ष काँग्रेस असो अथवा भाजपा जनतेच्या हितासाठी पुढे धजावला नाही. मात्र कर वसुली सक्तीने करण्यात आली. मग पाच वर्षात यानी केले तरी काय? असा प्रश्न मतदार करीत आहेत. जनतेचा कौल सध्यातरी शिवसेना शिंदे कडे आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये इनकमिंगचे सत्र सुरू असून अनेक पक्षाच्या बैठका सुरू असल्या तरी पक्षप्रवेश मात्र शिंदे शिवसेनेमध्येच होत आहेत. म्हणून होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक संधी शिंदे शिवसेनेला द्यावी अशी चर्चा जनसामान्यात आहे. होणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल परंतु सध्यातरी या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे बाजीमारेल अशा चर्चा चौका चौकात रंगत आहेत.






