प्रतिनिधी – संजय वाघमारे,एमकेएम मराठी न्यूज उमरखेड
📞 9302601023
दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी उमरखेड तहसील कार्यालयात शिवसेनेचा जाहीर निषेध व आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आयुष्यात ओल्या दुष्काळामुळे अंधार पसरलेला असताना,महायुती सरकार मात्र गप्प आणि बधिर बनले आहे शेतकऱ्यांच्या वेदनेला न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तर्फे काल दि. 21 ऑक्टोबर रोजी उमरखेड तहसील कार्यालयासमोर “काळी दिवाळी – शिदोरी आंदोलन” करण्यात आले.या आंदोलनात शासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करत ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० अनुदान द्यावे,संपूर्ण कर्जमाफी लागू करावी.अशा ठोस मागण्या करण्यात आल्या.
शिवसैनिक व शेतकरी बांधवांनी बेसन-भाकरी आणि ठेचा चटणी खाऊन आंदोलन करत शासनाच्या निष्काळजी धोरणांवर हल्ला चढवला.शासनाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या अश्रूंचे मूल्य समजले पाहिजे,असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.जगाचा पोशिंदा जर उपाशी असेल,तर दिवाळीला प्रकाश कसला?मातीशी नाळ जोडून जगाला अन्न देणारा हा शेतकरी,आज न्यायासाठी हात जोडतोय—हे आपल्या समाजाचं दुर्दैव नाही का?या कष्टकरी शेतकऱ्याच्या अंगावरच्या मातीत जगाच्या पोटासाठी अन्न दडलं आहे,तरी शासनाच्या पेटीत संवेदनांचा तुटवडा दिसतो.या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ऍड. बळीराम मुटकुळे,विधानसभा समन्वयक राजेश खामनेकर,उपजिल्हा संघटक डॉ.अजय नरवाडे,तालुकाप्रमुख सतीश नाईक,शहरप्रमुख अमोल नरवाडे,ढाणकी शहरप्रमुख कांता वासमवार,माझी आरोग्य सभापती संदीप ठाकरे,शहर संपर्कप्रमुख गजेंद्र ठाकरे,शहर संघटक राहुल सोनुने,युवा सेनेचे नितीन शिंदे,संजय पळसकर,संभाजी गोरडकर,संतोष जाधव, गजानन पवार,धर्मेंद्र मुद्गुलवार,अनिल कांबळे,मुमताज खान,विजय हनवते,रवी कदम,शिवशंकर मेंडके, संजय देवकर,अतुल पराते,श्रावण मामीलवाड,संतोष पवार,आकाश सूर्यवंशी तसेच असंख्य शिवसैनिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






