संपादक:- मायाताई क्षिरसागर पाईकराव.
महागांव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नगरवाडी शेतशिवारामध्ये गांजा आमली पदार्थ झाडे लागवड करणाऱ्यावर NDPS कायद्या अंतर्गंत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केली मोठी कारवाई.
यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे,शस्त्र बाळगणऱ्या तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा.पोलीस अधिक्षक श्री.कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.त्याच अनुषंगाने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक १४/१०/२०२५ रोजी स्थानिक गन्हे शाखा यवतमाळ कँम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मौजे नगरवाडी ता. महागांव येथील इसम नामे गजानन नारायण मेटकर हा त्यांचे नगरवाडी शेतशिवारातील शेत सर्वे नं १२/०१ या मध्ये गांजा आमली पदार्थ झाडांची लागवड केली आहे. अशी माहिती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठाना या बाबत अवगत करून मौजे नगरवाडी येथिल शेत सर्वे नंबर १२/o१ मध्ये जावून इसम नामे-गजानन नारायण मेटकर यास ताब्यात घेवून पंचा समक्ष त्यांच्या ताब्यातील शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये एकुण ३१ लहान मोठ्या आकाराची वजन एकुण ३७ किलो 500 ग्रॅम वजनाची गांजा आमली.पदार्थ झाडे असा एकुन १.८७. ५००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करून ताब्यात घेवून इसम नामे गजानन नारायण मेटकर वय ५० वर्ष रा नगरवाडी तालुका महागांव जि यवतमाळ यांच्या विरुद्ध महागांव पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( NDPS ) कालम ८ (ब ),२० (b),( i ) अन्वये अपराध क्रंमाक ५२०/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदीसह कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे,शस्त्र बाळगणाऱ्या,गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्य तस्करीचे उच्चाटन करण्यास प्रतिबद्ध असून यापुढे यासंबधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने. पोलीसाची कोणतीही भिती न बाळगता पुरवावी व पोलिसांना सहकार्य करावे ही विनंती
सदरची कारवाई,मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री.कुमार चिंता ( भा.पो. से.) सा,मा.अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री.पियुष जगताप ( म.पो.से.) सा.तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.हनुमंत गायकवाड,सा.मा.पोलीस निरिक्षक श्री सतिश चवरे,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,पोलीस निरिक्षक धनाराज निळे पोलीस स्टेशन महागांव यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे,पोउपनि/शरद लोहकरे,पोहवा/संतोष भोरगे,सफौ/मुन्ना आडे,पोहवा/संतोष भोरगे,पोहवा/तेजाब रणखांब,पोहवा/सुभाष जाधव,पोहवा/कुणाल मुंडोकार,पोहवा/रमेश राठोड,पोशि/सुनिल पंडागळे,चापोउपनि रविंद्र श्रीरामे,पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.






