प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे,शस्त्र बाळगणऱ्या तसेच अवघड गुन्हे,आरोपी शोध,तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा.पोलीसीधक्षक श्री.कुमार चिंता (भा. पो.से.) यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.त्याच अनुषंगाने पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक १४/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा कडील पथक महागांव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली कि,मौजे येथील इसम नामे शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनांतून गोवंश मांसाची वाहतूक करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने नमुद पथकांने पेढी-पोखरी रोडवर सापळा रचून सदरचे वाहन क्रमांक एम एच ०५ ऐजे ६५२१ थांबवून चेक केले असता त्या मध्ये ११० किलो गोवंश मांस प्रतिकिलो २४० प्रमाणे असा एकुण २६,४००/- व सदर वाहन किंमत १.००,०००/-रु.असा एकुण १,२६,४००/- रुपये मुद्देमाल बाबत पशू वैद्यकिय अधिकारी यांना अभिप्राय घेवून त्या प्रमाणे पंचनामा करून ताब्यत घेवून इसम नामे शेख अकील शेख मिरांजी वय ४३ वर्ष,रा.पेढी ता.महागांव जि.यवतमाळ यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन महागांव येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री.कुमार चिंता ( भा. पो. से.) सा,मा.अप्पर पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री.पियुष जगताप ( म. पो.से.) सा.तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.हनुमंत गायकवाड,सा.मा.पोलीस निरिक्षक श्री सतिश चवरे,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ,यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे,पोउपनि/शरद लोहकरे,पोहवा/ संतोष भोरगे,सफौ/मुन्ना आडे,पोहवा/ सुभाष जाधव,पोहवा/कुणाल मुंडेकार,पोहवा/ रमेश राठोड,पोशि/ सुनिल पंडागळे,चापोउपनिरविंद्र श्रीरामे,पोशि/ राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.






