प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव, यवतमाळ.
दिनांक 26/09/ 2025 रोजी दुपारी अंदाजे 02/00 वाजता दरम्यान नामे विलास शेबे वय अंदाजे 50 वर्षे राहणार महागाव यांनी पोलीस स्टेशन महागाव येथे येऊन कळविले की महागाव बाजार मध्ये बाजार घेत असताना त्यांच्या मालकीचा 1+ नोट मोबाईल फोन किंमत 30,000 हजार रुपये किमतीचा कुठेतरी गहाळ झाला या बाबत महागांव पोलीस स्टेशनला नोंद घेऊन तपास सुरू केला व तपासा दरम्यान सदर मोबाईल हा बिहार राज्य येथे मिळून आल्याने सदर मोबाईल ताब्यात घेऊन आज दिनांक 13/10/25 रोजी विलास शेबे यांच्या ताब्यात दिला.
सदरची कार्यवाही माननीय पोलीस निरीक्षक श्री धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम शेख,पोलीस शिपाई सुरेश महल्ले यांनी योग्यरीत्या पार पाडली.






