हजारो भीमसैनिक सहभागी होणार!-चरणदास इंगोले*
मायाताई सागर पाईकराव प्रतिनिधी यवतमाळ.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 रोजी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती करिता आंबेडकरी पक्ष व सर्व सामाजिक व धार्मिक बौद्ध संघटनांच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विशाल महामोर्चात माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा देखील सहभाग राहणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी दिली आहे.
ऐतिहासिक धम्मदीक्षा दिनाच्या दिवसावर 14 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12.वाजता आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केला गेलेला सर्वपक्षीय महामोर्चा भव्य दिव्य व्हावा यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात व्यापक अशी प्रचार मोहीम राबवून या धम्म आंदोलनाला यशस्वी करण्याच्या दृष्टीने आंबेडकरी अनुयायांना आव्हान करण्यात आले आहे.
बोधगया करे पुकार! मुक्त करो महाबोधी विहार!!अशी भीम गर्जना करत रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बौद्ध भिक्खू संघ, सर्वपक्षीय बौद्ध व आंबेडकरी नेते, सर्व धार्मिक बौद्ध संस्था, सामाजिक व सांस्कृतिक बौद्ध संघटनां सह तमाम आंबेडकरी अनुयायांचा सहभाग राहणाऱ्या आणि भीम अनुयायांच्या एकजुटीचे दर्शन घडवणाऱ्या लाखो भीमसैनिकांच्या उपस्थितीत या विशाल महामोर्चात जगप्रसिद्ध
लॉंगमार्च प्रणेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात राज्यातील पूर्व विदर्भ ,पश्चिम विदर्भ ,मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र( खानदेश) पश्चिम महाराष्ट्र ,कोकण प्रदेशा सह मुंबईतून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या सहभागी होणाऱ्या हजारो भीमसैनिकासोबतच अमरावती जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने पक्षाचे भीमसैनिक व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आपला स्नेहांकित
चरणदास इंगोले
प्रदेश कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी






