दिंगाबर शिरडकर ढाणकी
ढाणकी शहरात 3 ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेचे भक्तीमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. ऐकून 16 दुर्गा मंडळ मिरवणुकीत होते. सर्व मिरवणूकीतील देवी मंडळ आठवडी बाजार येथे 11 वाजताच्या सुमारास जमले होते. तदनंतर मिरवणूक मार्गे मिरवणूकीस सुरुवात झाली.अतिशय भक्तीमय वातावरणार दुर्गा मातेच्या जय घोष करीत पारंपरिक वाद्याच्या गजरात मातेस निरोप देण्यात आला. मिरवणूकिदरम्यान महिला मंडळानी मिरवणूक मार्गांवरील रस्त्यात दुर्गामातेच्या स्वागतसाठी जागोजागी रांगोळीची आरास काढण्यात आली होती. बऱ्याच वर्षांपासून डी. जे. च्या कर्कशा आवाजात मिरवणूक होत होत्या परंतु शांतता समितीच्या मीटिंगमध्ये बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सर्व मंडळांना डीजे विरहित पारंपारिक वाद्य लावूनच दुर्गा विसर्जन करण्याचे आव्हान केले होते. चांगल्या गोष्टीचे कुठेही स्वागत व कौतुक केले जाते. त्याप्रमाणे मंडळांनी सुद्धा ठाणेदार शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. व सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्य, ढोल ताशे पथक, भजनी मंडळ यांचा मिरवणुकी दरम्यान समावेश केला होता. या मिरवणुकीमध्ये आशीर्वाद दुर्गाउत्सव मंडळ यांनी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी बकासुर व तात्या विंचू आणले होते.त्यामुळे सर्वांचे लक्ष बकासुर व तात्या विंचू पाहण्याकडे लागले होते.कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय शांतता प्रिय वातावरणात हर्ष उल्हासात दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले होते. स्थनिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष मनवर, बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी चौख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.उपनिरीक्षक सागर अन्नमवार तसेच पोलीस कर्मचारी मोहन चाटे, रवी गीते, राहुल कोकरे,प्रकाश मुडे, रोशन सरनाईक, प्रवीण जाधव,यांनी विशेष परिश्रम घेतले.







