प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ.
साहित्य, समाजसेवा आणि बौद्ध धम्म प्रचार–प्रसार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सावित्रीबाई हनुमंत शेवाळकर सुजायतपूर ता. देगलूर जि. नांदेड यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली तर्फे दिला जाणारा “सावित्रीबाई फुले नॅशनल फेलोशिप अवॉर्ड २०२५ हा प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्लीतील पंचशील आश्रम,झरोडा गाव बुराडी बायपास येथे आयोजित ४१ व्या राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलनात प्रदान केला जाणार आहे.या संमेलनात देशभरातील नामांकित साहित्यिक,पत्रकार,संपादक, संशोधक व समाजसेवक सहभागी होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारधारेवर तसेच दलित साहित्य चळवळीच्या प्रगतीवर विचारमंथन होणार आहे.
सावित्रीबाई शेवाळकर ह्या आंबेडकरी चळवळीतील खंबीर नेत्रुत्वाच्या सेविका तर समाजभिमुख लेखिका,समाजसेविका व बौद्ध धम्म प्रचारक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. समाजातील वंचित,शोषित व उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच स्त्रीशिक्षण,समता आणि मानवता यांच्या मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांनी निःस्वार्थपणे कार्य केले आहे. त्यांचे लेखन समाजपरिवर्तन,बौद्ध मूल्ये व स्त्री सक्षमीकरण या विषयांवर आधारित असून त्या राज्य स्तरिय जेतवन अखील भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या आयोजिका असून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारात ही अग्रेसर आहेत.भारतीय दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.एस.पी.सुमनाक्षर यांनी सांगितले की,“सावित्रीबाई शेवाळकर या समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्ती आहेत. त्यांचे साहित्य हे समतेच्या चळवळीचे बळ आहे. म्हणूनच त्यांना या वर्षीचा ‘सावित्रीबाई फुले नॅशनल फेलोशिप अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येत आहे.
हा पुरस्कार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांवर चालत मी समाज कार्य करीत आले.हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून समाजसेवेच्या मार्गावरील कार्याची पावती आहे.या पुढेही मी सदोदीत समाज कार्य करत राहील सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सावित्रीबाई शेवाळकर यांनी म्हटले या सन्मानाने देगलूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून विविध सामाजिक संघटना आणि साहित्यिक क्षेत्रांतून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






